Beed Crime News | तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गावगुंडांकडून मारहाण, बंदुकीचा धाक दाखवत शिक्षकाला मारहाण
बीड:तुमची मुलगी मला द्या म्हणत शिक्षकाला गाव गुंडाकडून मारहाण बंदुकीचा धाक दाखवत मारहाण ट्रॅक्टर गाडीवर घालून दर्शविला अपघात जखमी शिक्षकाच्या नातेवाईकांकडून आरोप गंभीर जखमी शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ... बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील एका विद्यालयासमोर धक्कादायक प्रकार घडला आहे.. तुमची मुलगी मला द्या... म्हणत शिक्षकालाच एका गावगुंडाने जबर मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बंदुकीच्या धाकावर करण्यात आला.. असा आरोप शिक्षकाच्या नातेवाईकांनी केलाय.. यानंतर शिक्षकाच्या गाडीवर ट्रॅक्टर घालत मोठे नुकसान देखील केलं.. बाजीराव डोईफोडे असे या शिक्षकाचे नाव असून शिक्षकावर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या प्रकरणात अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही..